22 मोबाईलसह स्कूटर जप्त : पणजी पोलिसांनी केली कारवाई
प्रतिनिधी / पणजी
पणजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन मोबाईल चोरटय़ांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 22 मोबाईल व एक स्कूटरही जप्त केली आहे. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलल्या संशयितांमध्ये तौसिफ अहमद (25) व मोहमद दानिश (32) यांचा समावेश असून दोघेही उत्तर प्रदेश येथील आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले होते. पणजी पोलिसांनी त्याबाबत तपासकाम सुरु केले असता दोन संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत, जप्त केलेले मोबाईल सुमारे 5 लाख रुपये किमंतीचे आहेत. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









