ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना लसीच्या दोन भिन्न कंपन्यांचे डोसही कोरोनावर प्रभावी ठरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिली आहे.
स्वामिनाथन म्हणाल्या, व्यक्तीला दोन भिन्न कंपन्यांच्या कोरोना लस दिल्यामुळे शरिरात उच्चस्तरीय ऍन्टीबॉडी आणि पांढऱ्या पेशी तयार होत आहेत. या कोरोना विषाणूने प्रभावित पेशींचा खात्मा करतात. जगभरातील लसींच्या तुटवडय़ावर मार्ग काढत दोन भिन्न कंपन्यांच्या लसीची चाचणीही काही देशांकडून सुरू आहे. मलेशियामध्ये नागरिकांना पहिला डोस कोव्हिशिल्डचा तर दुसरा डोस फायझरचा देण्याचा विचार सुरू आहे.
दोन भिन्न कंपन्यांचे डोस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी आणि अन्य साइड इफेक्ट्स दिसून येतात. मात्र, ते गंभीर नाहीत, असेही स्वामिनाथन म्हणाल्या.