वार्ताहर/ शाहूपुरी
सातारा शहरातील शहापुर माध्यमातुन पाणी वितरण होणाया सर्व नागरीकांना कळविणेत येते की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत सातारा यांचेकडून 11 केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनी दुरुस्ती व मान्सूनपूर्व देखभाल यासाठी बुधवार दि. 19 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 या वेळेत करणेत येणार आहे. त्यामुळे शहापूर योजनेचा विद्युत
पुरवठा बंद राहणार आहे. त्याचा परिणाम म्हणून विद्युत पुरवठा बंद असलेने पाणी उपसा केंद्रातून शहरातील वितरण टाक्यांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. सदरचे काम पूर्ण होण्यास 6 ते 8 तासांच्या कालावधी लागणार असलेने बुधवार दि.19 रोजी दुपारच्या सत्रातील व गुरुवार दि. 20 रोजी सकाळ सत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तरी बुधवार दि. 19 रोजी सकाळ सत्रातील घोरपडे टाकी माध्यमातून होणारा चार भिंती टाकी ते कूपर
कारखाना अखेर असणा-या डोंगराळ भागातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे यशवंत गार्डन टाकी माध्यमातून पाणी वितरण होणा-या कुंभार वाडा परिसर, लोणार गल्ली परिसर, पोवई नाका भाजी मंडई, पेठ रविवार, पेठ मल्हार काही भाग, पंताचा गोट, तसेच सायंकाळच्या सत्रातील पेठ मल्हार शेटे चौक, गुरुवार पेठ काही भाग मल्हार पेठ काही भाग या भागात सायंकाळ 5 च्या सत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवार दि. 20 रोजी सकाळ सत्रातील शहापूर उद्भव योजनेतून पाणी पुरवठा होणा-या गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपेडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकी या टाक्यांद्वारे वितरीत होणा-या भागातील
सर्व नागरिकांना कळविणेत येते की, 11 केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनी दुरुस्ती व मान्सूनपूर्व देखभाल करणेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. सातारा यांनी विद्युत पुरवठा बंद ठेवलेने सकाळ सत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तरी नागरिकांनी उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती सिता हादगे, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे , नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.









