सातारा / प्रतिनिधी
सातारा शहरात जबरी चोरी व चिकन सेंटर मधील चोरी अशा दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या मुस्क्या सातारा शहर डी.बी.पथकाने आवळल्या.विजय उर्फ सावळा जावळे (रा.गणेशनगर ,कोर्टी ता.कराड जि.सातारा), सादिक शहीद सिद्दीकी (वय २० मुळ रा.तुलसीपुर जि.बळरामपुर राज्य-उत्तर प्रदेश) अशी दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि.13 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हे सातारा शहर पोलीस ठाण्यात असताना फिर्यादी हे घाबरलेल्या अवस्थेत धावत आल्याचे पाहुन त्यांच्याकडे चौकशी केली असता ते मनाली हॉटेल समोरुन भाजी खरेदी करून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने दुचाकीवरुन येवुन त्यांच्या शर्टचे वरील खिशातील मोबाईल फोन जबरदस्तीने चोरुन नेला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे हा प्रकार भरमंडईमध्ये झाला असल्याने परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल व पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी या ठिकाणची माहिती घेवुन आरोपीस ताब्यात घेणेबाबत मार्गदर्शन करुन योग्य त्या सुचना दिल्या त्याप्रमाणे पो.उपनिरीक्षक एन.एस.कदम व डी.बी.पथकाने संशयीत आरोपीची माहिती घेवुन व गोपनिय माहीती दारांमार्फत माहिती मिळवली असता संशयीत हा उंब्रज परिसरातील असल्याची खात्री झाली. त्याप्रमाणे लागलीच डी.बी.पथकाने मोबाईलची तांत्रिक माहिती घेत संशयीतास शेंद्रे ता.जि.सातारा येथुन हायवे रोडवर पाठलाग करुन ताब्यात घेतले. व त्याचेकडुन चोरीस गेला विवो कंपनीचा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटर सायकल हस्तगत केली आहे.तसेच दि.११रोजी नॅशनल चिकन सेंटर मधुन कामगाराने मोबाईल फोन व रोख रक्कम चोरी करुन चोरुन नेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.दि.१२रोजी गुन्ह्यातील आरोपी हा महाबळेश्वर येथे असल्याची गोपनिय माहीती गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाल्याने पो.नि.आण्णासाहेब मांजरे यांनी डी.बी.पथकास मार्गदर्शन करुन त्यांचे एक पथक महाबळेश्वर येथे पाठवुन दिले.पो.उपनिरीक्षक एन.एस.कदम व त्यांचे डी.बी.पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे महाबळेश्वर येथुन संशयीत आरोपी सादिक शहीद सिद्दीकी( वय २० मुळ रा तुलसीपुर जि.बळरामपुर राज्य-उत्तर प्रदेश) यास सापळा रचुन ताब्यात घेतले व त्याचेकडुन चोरीतील मोबाईल फोन हस्तगत करुन गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पो.ना.अरुण दगडे करित आहेत.









