राजापूर / वार्ताहर
राजापूर तालुक्यातील रायपाटण खाडेवादी येथे एका विवाहितेने 2 चिमुरड्यांसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेशोत्सव 2 दिवसांवर आलेला असताना घडलेल्या या घटनेने राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सुहासिनी सुभाष सावंत असे या महिलेचे नाव असून या दुर्दैवी घटनेत मनस्वी व जान्हवी या दोन चिमुरडींचाही मृत्यू झाला आहे.









