प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात वाढणारा संसर्ग आणि लोकांचा निष्काळजीपणा यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारपासून जिल्हय़ात हाफ लॉकडाऊन सुरू केला. शुक्रवारी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. सकाळी नऊला सुरू झालेल्या बाजारपेठा दुपारी दोनच्या ठोक्याला बंद झाल्या. त्यामुळे हाफ लॉकडाऊन पहिल्या दिवशी यशस्वी झाल्याचे दिसत होते. दरम्यान जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 16 नागरिकांना शुक्रवारी दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे तर जिल्ह्यातील 4 बाधितांचा मृत्यू झाले असून रात्री उशिराचा अहवाल आल्यानंतर त्यात 12 जण बाधित असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
‘तरुण भारत’च्या भूमिकेला शिवसेनेचा दुजोरा
‘तरूण भारत’ने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या मनातील लॉकडाऊन हवाच, अशी भूमिका घेतली होती. प्रशासनाने हाफ लॉकडाऊन करत ‘तरूण भारत’च्या या भूमिकेचा अप्रत्यक्षपणे स्वीकार केला आहे. पहिल्या दिवशी जिल्हावासियांनी याचे पालन केले. कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही अशी जनभावनाही असून त्याला सातारा शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्ह्यात दहा दिवस जनता कर्फ्यू पाळला जावा अशी मागणी करत दुजोरा दिला आहे.
शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात
घेतलेले एकुण नमुने 17133
एकूण बाधित 1555
घरी सोडण्यात आलेले 950
मृत्यु 65
उपचारार्थ रुग्ण 540
शुक्रवारी
एकूण बाधित 12
एकूण मुक्त 16
एकूण बळी 04








