दोडामार्ग नगराध्यक्षांचे मुख्याधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर / दोडामार्ग:
अग्निशमन दलाचे साहित्य, सक्शन व्हॅन, एलईडी, स्ट्रीटलाईट आदींच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असून याबाबत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष लीना कुबल यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱयांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 9 ऑगस्ट 2017 मध्ये अग्निशमन साहित्य 9 जानेवारी 2018 मध्ये सक्शन व्हॅन व एलएडी स्ट्रीटलाईट खरेदी करण्यात आल्या. मुख्याधिकारी वैभव साबळे, नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या कालावधीत हे साहित्य खरेदी केले आहे. 10 ऑगस्टच्या निवेदनानुसार मुख्याधिकारी गायकवाड यांनी त्वरित पंचनामा करून सदरील सर्व साहित्य आहे की नाही, याची चर्चा करावी तसेच लेखी स्वरुपात किती साहित्य आहे, साहित्याची किंमत किती? याची माहिती सादर करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगराध्यक्ष कुबल यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.









