दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग मधील दिवाणी न्यायालयात काल शनिवारी आयोजित लोक अदालतमध्ये विविध प्रलंबित, वादपूर्व प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली यामधून 86 हजार 878 रुपये वसूल करण्यात आलेत. यावेळी दिवाणी न्यायाधीश वाय. पी. बावकर यांच्या हस्ते लोकअदालतचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत वकील संघटनेचे अध्यक्ष बी. व्ही. नाईक, ॲड. सोनू गवस, ॲड. सम्राट देसाई, ॲड. शैलेश धुरी, ॲड. विश्राम घोगळे, सहाय्यक अधीक्षक यु. जी. महाले, वरिष्ठ लिपिक के. एम. आडणेकर, एस. जी. मडवळ, कनिष्ठ लिपिक जी. बी. शेर्लेकर, एस. के. पवार, लघुलेखक कु. एल.एम. पेडणेकर यांसह एम. पी. नागरगोजे, ए. एस. काटकर , पी.पी.जाधव,आदी उपस्थित होते.
या लोकअदालत मध्ये कोर्टाची प्रकरणे 56 ठेवली होती त्यातील 16 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली व त्यातून 7 हजार 800 रुपये वसूल करण्यात आलेत. तसेच पतसंस्था, वीज महावितरण, ग्रामपंचायत यांची 369 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातील 37 प्रकरणे निकाली काढण्यात आलीत. व त्यातून 79 हजार 78 रुपये एवढे वसूल करण्यात आलेत. अशा प्रकारे एकूण 86 हजार 878 रुपये वसूल करण्यात आलेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









