सावंतवाडी/ प्रतिनिधी-
आमदार दीपक केसरकर यांच्या खोट्या आश्वासनाला आता जनता कंटाळली आहे. दोडामार्ग नगरपंचायत च्या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. केसरकरांना योग्य उत्तर मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिले आहे या नगरपंचायत निवडणुकीत लोकांच्या दारोदारी घरोघरी जाऊन विकासाची खोटी आश्वासने केसरकर फक्त देत राहिले. यावेळी जनतेने त्यांना योग्य धडा दाखवला आहे. केसरकर यांनी आता मनाची तरी लाज बाळगून आपल्या आमदार पदाचा राजीनामा द्यावा. दोडामार्गवासी या भाजपच्या पाठीशी उभे राहिले. कारण भाजप निश्चितपणे विकास करु शकते याची खात्री आता त्यांना झाली आहे. केसरकर यांनी आता आश्वासने देऊन फसवू नये असे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकान्वये दोडामार्ग नगरपंचायत च्या या बाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे .









