वार्ताहर / दोडामार्ग:
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरस व दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज पॅन इंडिया जागृती मोहीम उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दोडामार्ग न्यायालयामार्फत आज पासून ते येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत अर्थात 45 दिवसात दोडामार्ग तालुक्यातील गावागावात व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून कायदेविषयक माहिती पुरविणार असल्याचे येथील दिवाणी न्यायाधीश वाय. पी. बावकर यांनी बोलताना स्पष्ट केले. तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली असून त्याचा अमृतमहोत्सव देशभरात साजरा केला जातो आहे या महोत्सवाचा एक भाग म्हणून हि मोहीम असल्याचेही न्यायाधीश श्री. बावकर म्हणाले.
येथील न्यायालयात एका छोटेखानी कार्यक्रमात पॅन इंडिया जागृती व आउटरीज मोहीम उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण इंटरनेटद्वारे दाखविण्यात आले. या उदघाटन प्रसंगी अँड. सोनू गवस यांनीही उपस्थितांना कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच न्यायालय ते पंचायत समिती कार्यालया दरम्यान प्रभात फेरी देखील काढण्यात आली. या फेरीचा शुभारंभ न्यायाधीश श्री. बावकर यांनी केला. यावेळी न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. दाजी नाईक,
अँड. सोनू गवस, सहाय्यक अधीक्षक यु. जी. महाले, वरिष्ठ लिपिक के. एम. आडणेकर, एस. जी. मडवळ, कनिष्ठ लिपिक जी. बी. शेर्लेकर, एस. के. पवार, लघुलेखक एल. डी. सावंत, यांसह एम. पी. नागरगोजे, ए. एस. काटकर यांसह पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Previous Articleतांबोळीत वन्यजीव सप्ताह साजरा
Next Article पूरबाधितांना 71 कोटी अनुदान वितरीत









