दोडामार्ग – वार्ताहर
राज्यपरिवहन मंडळ अर्थात एसटीच्या दोडामार्ग – कोल्हापूर बसेसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. दोडामार्ग बसस्थानाकातून सकाळी 5.40 वा., 6.30 वा. व 9.00 वा. अशा फेऱ्या असून नजीकच्या काळात भारमान पाहून अन्य फेऱ्या वाढविल्या जातील असे वाहतूक नियंत्रक अमोल कामते यांनी सांगितले.









