दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे याबाबतचे निवेदन तहसीलदार अरुण खानोलकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष गोविंद कदम यांनी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुष यांचे नेहमी विविध प्रकारचे कार्यक्रम दोडामार्ग तालुक्यात होत असतात. शिवाय कोणतीही सभा, सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. सध्याच्या परिस्थितीत दोडामार्ग मध्ये हाॅलच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे हे कार्यक्रम आमच्या समाजातील किंवा इतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना परवडत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तालुक्यात उभारले गेल्यास सर्वांना सोयीस्कर ठरेल. लवकरात लवकर या भवनाचा प्रस्ताव मंजूर व्हावा याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षांनी दिले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांसह दिपक जाधव, संदिप गवस, बाबा खतिफ, नवराज कांबळे, संदेश वरक आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









