ऑनलाईन टीम / देहरादून :
देहरादून मधील रायपुरचे आमदार उमेश शर्मा काऊ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश शर्मा यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर उमेश शर्मा यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. तसेच त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून लोकांना आवाहन केले आहे की, मागील आठवड्यापासून जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःहुन आयसोलेट व्हावे तसेच गरज पडल्यास कोरोनाची चाचणी करून घ्यावी.









