कर्नाटक अनुसूचित जमात संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
देसूर ग्राम पंचायत अध्यक्षांचा अवमान ग्राम पंचायत सदस्याने केला असून त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करावे, या मागणीसाठी कर्नाटक अनुसूचित जमात व वाल्मिकी नोकर संघटना यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
देसूर ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी देवाप्पा पिरनवाडी या अनुसूचित जाती-जमातीच्या आहेत. त्यांचा अवमान ग्राम पंचायत सदस्य सतीश रामजी चव्हाण या सदस्याने केला आहे. त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसणे. तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणे हा प्रकार घडला आहे. एकप्रकारे हा अवमान असून सतीश यांचे सदस्यत्व तातडीने रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महेश शिगीहळ्ळी, मंजुनाथ एन. एम., सिद्राय शिगीहळ्ळी यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.









