नवी दिल्ली/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील मंडळींनी केलेल्या विधानांमुळे ते चर्चेत आले आहेत. यामध्ये कलाकारांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत त्यांनी केलेली अनेक विधाने गाजताना दिसत आहेत. यातच आता लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांची भर पडली आहे. देश दोन हिंदूमध्ये विभागला गेला आहे. एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे.
माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांच्या “द लाइट ऑफ एशिया:द पोएम दॅट डिफाइंड बुद्धा” या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आयोजित कार्यक्रमात मीरा कुमार यांनी हे वक्तव्य केलं.