771.79 कोटींची खासगी गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2020 मध्ये देशात एकूण 46 अन्न प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाले असून सदर प्रकल्पांचे कामकाज सुरु झाले आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 771.79 कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी आकडेवारीतून देण्यात आली आहे.
अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये 3 मेगा फूड पार्क, 15 कोल्ड साखळी, 21 युनिट आणि 7 फूड टेस्टिंग लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या आधारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 24,567 लोकांना रोजगार प्राप्त झाला असल्याचे समजते.
प्रक्रिया क्षमता वाढणार
देशामध्ये प्रकल्पात वर्षाच्या आधारे 31.52 लाख टन कृषी उत्पादनांवर प्रक्रिया केली जाणार असून ती आगामी काळातही वाढण्याचे संकेत व्यक्त केले आहेत.
कोल्ड साखळी
उपलब्ध माहितीनुसार 15 कोल्ड चेनच्या पायाभूत प्रकल्पातून देशामध्ये 56.99 लाख लिटर दूध प्रक्रिया व साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. सोबतच 11.80 टन प्रति तास फळभाज्यांची शितलीकरणाची क्षमता वधारली आहे.
47 कोल्ड साखळी प्रकल्पांना मंजुरी
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 2020 मध्ये जवळपास 47 कोल्ड साखळी पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 13.10 लाख लिटर दूध दररोज प्रक्रिया करणार असून यांची साठवण 34.20 मेट्रीक राहणार असल्याची माहिती आहे.









