युपीआय व्यवहार चार वर्षात दुपटीने तेजीत : बँकांचा फि मधील नफा घटला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही वर्षांमध्ये देशातील युपीआय पेमेंट सिस्टमने देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला मोठय़ा प्रमाणात चालना देण्यासोबत डिजिटल देवाणघेवाण करणे अगदी सोपे केले आहे.
याचा भाग म्हणून मागील चार वर्षांमधील मूल्याच्या हिशोबात रिटेल डिजिटल पेमेंटमध्ये युपीआयची हिस्सेदारी दोन पटपेक्षा अधिक झाली असल्याची माहिती आहे. मात्र दुसऱया बाजूला बँका, एनबीएफसी आणि फिनटेक कंपन्यांचा फि मधून मिळणारा नफा मात्र एक तृतीयांशने घटला आहे. त्यांना युपीआय व्यवहारातून उत्पन्न मिळत नाही.
साधारणपणे मोफत आणि सर्वात सोप्या सुविधांसह युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) चा वापर वर्षाच्या आधारे तेजीने वधारत जात आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अगोदर 9 महिन्यांमध्ये पर्सन टू पेमेंटमध्ये युपीआयची हिस्सेदारी 42 टक्क्यांवर पोहोचली आहे. जी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 28 टक्के होती. म्हणजेच अशाप्रकारच्या व्यवहारात दुपटीने वाढ झाली आहे. सद्यस्थिती अशी आहे, की मूल्याच्या हिशोबामध्ये फेब्रुवारीमध्ये जवळपास 80 टक्के डिजिटल पेमेंट युपीआय प्लॅटफॉर्मच्या आधारे करण्यात आल्याची नोंद केली आहे.
एमडीआय पेमेंट पूलमध्ये बँकांची हिस्सेदारी मोठी
साधारणपणे एमडीआर पेमेंटमध्ये बँकांचा सर्वात मोठा वाटा आहे, कारण अधिकतर कार्ड बँक सादर करते. बँक कार्डवर आधारीत पेमेंट आणि अन्य डिजिटल व्यवहारासाठी मर्चंटकडून शुल्क वसूल करु शकते, परंतु युपीआय पेमेंटसाठी शुल्क घेतले जात नाही.
कॅशलेसला चालना देण्यासाठी
कारण देशामध्ये डिजिटल पेमेंट व्यवहारांना जास्तीत जास्त चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यावर सरकारने भर दिला असल्याची माहिती आहे. 2021 च्या वर्षात युपीआयचे 38 अब्ज व्यवहार झाले आहेत.









