ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात 99 लाख 79 हजार 447 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 95 लाख 20 हजार 827 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मागील 24 तासात देशात 22 हजार 889 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 338 रुग्णांचा मृत्यू झाला. 99.79 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 3 लाख 13 हजार 831ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 44 हजार 789 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशात आतापर्यंत 15 कोटी 89 लाख 18 हजार 646 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 13 हजार 406 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.17) करण्यात आल्या.









