ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात 3 कोटी 01 लाख 83 हजार 143 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 91 लाख 93 हजार 085 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या 5 लाख 95 हजार 565 रुग्ण उपचार घेत आहेत.
शुक्रवारी 48 हजार नवे बाधित
शुक्रवारी देशात 48 हजार 698 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. 64 हजार 818 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 1183 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 94 हजार 493 एवढी आहे.