ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 43 हजार 393 नव्या संक्रमितांची नोंद झाली. यामधील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र (9083) आणि केरळमध्ये (13772)आढळले. गुरुवारी 44 हजार 459 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 911 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 3 कोटी 07 लाख 52 हजार 950 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 98 लाख 88 हजार 284 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात 4 लाख 58 हजार 727 उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4 लाख 05 हजार 939 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
गुरुवारी 40 लाख 23 हजार 173 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. देशात आतापर्यंत 36.89 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.









