ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 6767 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 31 हजार 868 वर पोहचली असून, मृतांची संख्या 3867 एवढी आहे.
सध्या देशात 73 हजार 560 ॲक्टिव कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 54 हजार 440 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 47 हजार 190 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 15 हजार 512, गुजरातमध्ये 13 हजार 664 मध्यप्रदेश 6371, आंध्र प्रदेश 2757, बिहार 2380, राजस्थान 6742 तर पश्चिम बंगालमध्ये 3459 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.









