ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात शुक्रवारी मागील 70 दिवसातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र, कोरोनामृत्यूंची संख्या पुन्हा 4 हजारांवर गेली असून, ही चिंतेची बाब बनली आहे.
गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 84,332 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 4002 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत कोरोना मृतांची संख्या 3 हजारच्या खाली होती. परंतु, ही वाढ पुन्हा एकदा आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय बनली आहे. आतापर्यंत 3,67,081 कोरोना रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.
देशात आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 59 हजार 155 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. शुक्रवारी 1 लाख 21 हजार 311 रुग्णांनी तर आतापर्यंत 2 कोटी 79 लाख 11 हजार 384 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या 10 लाख 80 हजार 690 रुग्ण उपचार घेत आहेत.









