ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात कोरोनाने 3293 रुग्णांचा बळी घेतला आहे. एका दिवसातला मृतांचा हा आकडा सर्वाधिक असून, आतापर्यंत 2 लाख 01 हजार 187 रुग्ण कोरोनाने हिरावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एका दिवसात 2 लाख 61 हजार 162 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 1 कोटी 48 लाख 17 हजार 371 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
दरम्यान, देशात मागील 24 तासात 3 लाख 60 हजार 960 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. देशात आतापर्यंत 1 कोटी 79 लाख 97 हजार 267 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. सध्या 29 लाख 78 हजार 709 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 14 कोटी 78 लाख 27 हजार 467 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 28 कोटी 27लाख 03 हजार 789 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 17 लाख 23 हजार 912 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.27) करण्यात आल्या.









