ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 6977 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 154 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 38 हजार 145 वर पोहचली असून, मृतांची संख्या 4021 एवढी आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या एकूण आकडेवारीने इराणलाही मागे टाकले आहे. आजच्या वाढीमुळे भारत जगामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर गेला आहे.
सध्या देशात 77 हजार 103 ॲक्टिव कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 50 हजार 231रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 16 हजार 277, गुजरातमध्ये 14 हजार 056 मध्यप्रदेश 6665, आंध्र प्रदेश 2823, बिहार 2587, राजस्थान 7028 तर पश्चिम बंगालमध्ये 3667 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.









