ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 20 हजार 550 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 286 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 02 लाख 44 हजार 853 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 48 हजार 439 एवढी आहे.
मंगळवारी 26,572 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 2 लाख 62 हजार 272 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 98 लाख 34 हजार 141 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात 17 कोटी कोरोना चाचण्यादेशात आतापर्यंत 17 कोटी 09 लाख 22 हजार 030 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 20 हजार 381 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.29) करण्यात आल्या.









