ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी देशातील 2.5 कोटी लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर आज मोदेंनी डॉक्टर, आरोग्यसेवक आणि कोरोना लसीच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी एका दिवसात 2.5 कोटी लोकांचे लसीकरण झाले, अन् ताप एका पक्षाला आला, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.
मोदी म्हणाले, लस घेतल्यानंतर 100 पैकी एका व्यक्तीला त्रास होतो, असे मी ऐकले आहे. पण काल जेव्हा आरोग्य कर्मचाऱयांनी अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांना लसीचे डोस दिले तेव्हा पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. अन् त्यांचा ताप वाढला. याचं काही लॉजिक असू शकतं का?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला.
दरम्यान, लोकांना कोरोना रोखण्यासाठी ही लस दिली असल्याचे आम्ही सांगितले. मात्र, तरीही लोकांनी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर राखणे सुरूच ठेवायचे आहे, असे मोदींसोबत संवाद साधणाऱया डॉक्टरांनी म्हटले आहे.









