ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना संक्रमणाचा वेग काहीसा मंदावला आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. शुक्रवारी तर 3 लाख 57 हजार 630 रुग्ण पूर्णपणे बरे झाले. तर आतापर्यंत देशात 2 कोटी 30 लाख 70 हजार 365 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मृतांचा वाढता आकडा चिंताजनक
संक्रमणाचा मंदावलेला वेग आणि बरे होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या जरी दिलासादायक असली तर देखील देशातील कोरोना बळींचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही. ही बाब देशासाठी चिंताजनक आहे. मागील 24 तासात देशात 2 लाख 57 हजार 299 नवे संक्रमित रुग्ण आढळले. तर 4194 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 2 कोटी 62 लाख 89 हजार 290 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 लाख 95 हजार 525 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
आतापर्यंत देशातील 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.









