ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 05 लाख 42 हजार 841 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 01 लाख 79 हजार 715 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 2 लाख 11 हजार 033 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 15 हजार 158 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 16 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शुक्रवारी 275 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 093 एवढी आहे.
देशात आतापर्यंत 18 कोटी 57 लाख 65 हजार 491 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 03 हजार 093 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.15) करण्यात आल्या.