ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 2 कोटी 83 लाख 07 हजार 832 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 61 लाख 79 हजार 085 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या 17 लाख 93 हजार 645 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मंगळवारी 1 लाख 32 हजार 788 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 2 लाख 31 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3207 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 35 हजार 102 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 लोकांना लस देण्यात आली आहे.









