ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट पहायला मिळत आहे. रविवारी देशात 1 लाख 636 नव्या संक्रमितांची नोंद झाली असून, मागील 62 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 5 एप्रिलला 96 हजार 563 संक्रमित रुग्ण आढळले होते. मागील 24 तासात 1 लाख 74 हजार 399 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2427 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख 09 हजार 975 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 71 लाख 59 हजार 180 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 14 लाख 01 हजार 609 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 49 हजार 186 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आतापर्यंत देशातील 23 कोटी 27 लाख 86 हजार 482 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. रविवारी देशात 15 लाख 87 हजार 589 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.









