ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली आहे. शुक्रवारी देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या संक्रमितांची नोंद झाली. तर 2 लाख 84 हजार 601 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 3617 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 2 कोटी 77 लाख 29 हजार 247 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 51 लाख 78 हजार 011 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 22 लाख 28 हजार 724 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 22 हजार 512 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आतापर्यंत देशातील 20 कोटी 89 लाख 02 हजार 445 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. शुक्रवारी देशात 20 लाख 80 हजार 048 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.









