ऑनलाईन टीम / तरुण भारत
जागतिक स्तरावर अनेक देशांच्या चिंतेत भर घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटचा फैलाव झपाट्याने होत आहे. या पार्श्वभुमीवर अनेक देशांनी कोरोना नियमावली आखत निर्बंध लागु केले आहेत. याचबरोबर भारतात ही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि शाळा-कॉलेजांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. पण पॅनिक होण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका. असं आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.
देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण अतिशय झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर सुरू आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे ओमायक्रॉन बाधितही आढळून येत आहे. आज आढळलेली कोरोनाबाधितांची संख्या ही कालच्या रूग्ण संख्येपक्षा २ हजार ३६९ रूग्णांनी जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय, मागील २४ तासात ३१४ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झालेली आहे. १ लाख ३८ हजार ३३१ रूग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. देशातील अथवा राज्यातील कोरोना स्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वी नागरीकांनी कोरोनानियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे.