बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याच्या कोरोना कक्षाच्या आकडेवारीनुसार, रविवारीपर्यंत कर्नाटकात देशातील प्रत्येक लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक १६,३६० आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.
लडाख व पुडुचेरी यांनी दुसर्या आणि तिसर्या क्रमांकाच्या आरटी-पीसीआर चाचण्या (अनुक्रमे १४,७६९ आणि १४,४८८) घेतल्या आहेत, तर तेलंगणाने सर्वात कमी २२१ चाचण्या घेतल्या आहेत.
कर्नाटकने देशातील प्रत्येक लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक आरटी पीसीआर चाचण्या केल्या आहेत. कर्नाटकातील कोरोना नियंत्रित करण्याचे हे एक कारण आहे. कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी एक मार्ग म्हणजे सामाजिक अंतर, मास्क आणि स्वच्छता राखणे, आवश्यक असल्याचे मुनीश मौदगिल यांनी म्हंटले आहे.









