नवी दिल्ली /प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात रविवारच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ७ हजारांनी घट झाली आहे. सोमवारी देशात ३१ हजार २२२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २९० कोरोनाग्रस्तांचा कोरोनाने प्राण गेला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशात सोमवारी ४२ हजार ९४२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
देशात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ३० लाख ५८ हजार ८४३ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २२ लाख २४ हजार ९३७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ४१ हजार ४२ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. दरम्यान, देशात सध्या ३ लाख ९२ हजार ८६४ सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ६९ कोटी ९० लाख ६२ हजार ७७६ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.