ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना संक्रमणाचा वेेग काहीसा कमी झाला आहे. 4 लाखांच्या वर पोहचलेली दैनंदिन रुग्णसंख्या 35 दिवसानंतर 2.50 लाखांच्या खाली आली आहे. मृतांच्या आकडाही शनिवारी कमी झाला. मागील 24 तासात 2 लाख 40 हजार 842 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. 3 लाख 55 हजार 102 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 3741 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत 2 कोटी 65 लाख 30 हजार 132 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 34 लाख 25 हजार 467 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 28 लाख 05 हजार 399 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 99 हजार 266 रुग्ण दगावले आहेत.
आतापर्यंत देशातील 19 कोटी 50 लाख 04 हजार 181 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.









