ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात पुन्हा एकदा संक्रमणाचा वेग वाढला आहे. शुक्रवारी देशात 46 हजार 759 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामधील 32 हजार 801 रुग्ण केरळमधील आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 3 कोटी 26 लाख 49 हजार 947 वर पोहचली आहे.
शुक्रवारी 31 हजार 374 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 509 जणांनी आपले प्राण गमावले. सध्या देशात 3 लाख 59 हजार 775 उपचारार्थ रुग्ण असून, 4 लाख 37 हजार 370 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 3 कोटी 18 लाख 52 हजार 802 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात आतापर्यंत 62.29 कोटी नागरिकांचे तर काल दिवसभरात 1.03 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.









