ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना संक्रमणाचा वेेग आता काहीसा मंदावला आहे. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. मागील 24 तासात 2 लाख 81 हजार 386 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. 3 लाख 78 हजार 741 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 4106 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 11 लाख 74 हजार 076 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 35 लाख 16 हजार 997 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 74 हजार 390 रुग्ण दगावले आहेत.
आतापर्यंत देशातील 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.









