ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात अजूनही कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. मागील 24 तासात देशात 37 हजार 593 नवे रुग्ण आढळून आले. तर 648 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 34,169 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्या आधी मंगळवारी 34,169 लोक कोरोनामुक्त झाले होते.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय रूग्णांची संख्या अजूनही 3 लाख 22 हजार 327 इतकी आहे. तर देशात आतापर्यंत 59.55 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, देशात सध्याचा रिकव्हरी रेट 97.67 टक्के इतका आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 12 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 4 लाख 35 हजार 758 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 54 हजार लोक बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 24 ऑगस्टपर्यंत देशभरात कोरोना लसीचे 59 कोटी 55 लाख 4 हजार डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी 61.90 लाख लसी देण्यात आल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मते, आतापर्यंत 51 कोटी 11 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सुमारे 17.92 लाख करोना नमुने चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.









