24 तासात 75,829 बाधित, 940 मृत्यू : 65.49 लाख रुग्णांपैकी 55.09 लाख कोरोनामुक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच रविवारी मृतांच्या आकडय़ामध्येही काहीशी घट झालेली दिसून आली. रविवारी सकाळपर्यंत संपलेल्या चोवीस तासात देशात 940 जणांचा मृत्यू झाला. गेले कित्येक दिवस एक हजार ते बाराशेच्या दरम्यान असलेला मृतांचा आकडा बऱयाच दिवसांनंतर तीन अंकी आकडय़ात निदर्शनास आल्याने देशवासियांना सुखद धक्का बसला. तसेच दिवसाला 90 ते 98 हजारपर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 70 ते 80 हजारांपर्यंत खाली आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65 लाखांच्या पुढे गेली आहे, तर बळींची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या 24 तासात 75 हजार 829 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बाधितांची एकूण संख्या 65 लाख 49 हजार 373 इतकी झाली. याच कालावधीत 940 लोकांचा मृत्यू ओढवल्याने कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 1 लाख 1 हजार 782 इतकी झाली आहे. कोरोनावर मात करणाऱयांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात आतापर्यंत 55 लाख 9 हजार 966 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 9 लाख 37 हजार 625 जणांवर उपचार सुरू आहेत.
चाचण्यांमध्ये मोठी वाढ
देशात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबरपर्यंत देशात 7 कोटी 89 लाख 92 हजार 534 इतक्मया कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी एका दिवसात 11 लाख 42 हजार 131 चाचण्या करण्यात आल्या आहेत. टेस्ट, टेस आणि ट्रिट या त्रिसुत्रीच्या आधारे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याचा सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. सातत्याने वाढत असलेल्या चाचण्यांची क्षमता हे कोविड-19 संसर्गावर आळा घालण्याचे उत्तम साधन आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.









