ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात पहिल्यांदाच सीआरपीएफ महिला कमांडोंचे पथक तयार होत आहे. हे पथक देशातील व्हीआयपी लोकांना संरक्षण देणार देणार आहे. महिला कमांडोच्या पहिल्या तुकडीमध्ये ३२ महिला लढाऊ जवान आहेत, त्यांनी व्हीआयपी सुरक्षेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते १५ जानेवारीपर्यंत तैनातीसाठी तयार होतील. तसेच त्यांना झेड प्लस संरक्षकांसोबत तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे,” असे सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
देशात पहिल्यांदाच सीआरपीएफ महिला कमांडोंचे पथक तयार होत असून पहिल्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला कमांडो देखील तैनात केल्या जातील.