44 दिवसांनी झाली सर्वात कमी बाधितांची नोंद – दिवसभरात 1.86 लाख नवे रुग्ण, 2.59 लाख रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात जवळपास दीड महिन्याने म्हणजे 44 दिवसांनंतर कोरोनाबाधितांची सर्वात कमी संख्या नोंदवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकेडवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 1 लाख 86 हजार 364 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 660 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. याच कालावधीत 2 लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एकूण सक्रिय रुग्णसंख्येमध्ये दिवसभरात 76 हजार 755 ने घट नोंद झाली आहे. यापूर्वी बुधवारी 2 लाख 11 हजार 298 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3,847 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकूण बाधितांपैकी 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 जणांनी कोरोनावर मात केली असून 3 लाख 18 हजार 895 जणांचा बळी गेला आहे. देशात अजूनही 23 लाख 43 हजार 152 इतके रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान, देशभरात 27 मेपर्यंत 20 कोटी 46 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर गुरुवारी दिवसभरात 18 लाख 85 हजार 805 लसीचे डोस देण्यात आले. तसेच आतापर्यंत 33 कोटी 90 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या. गुरुवारी दिवसभरात 20 लाख 70 हजार कोरोना नमुन्यांची चाचणी करण्यात आली. चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्के इतका आहे.









