ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवस देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घेत झालेली पाहायला मिळाली. मागील २४ तासांत २० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच रविवारी दैनंदिन मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. रविवारी देशात १९ हजार ९६८ नव्या रुग्णांची नोंद आणि ६७३ जणांचा मृत्यू झाला होता. आज कालच्या आकडेवारीच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ३ हजार ९१७ने घट झाली आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत ४६७ने घट झाली आहे देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १.९३ टक्के झाला आहे. सध्या देशात २ लाख २ हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी २८ लाख ३८ हजार ५२४
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ४ कोटी २१ लाख २४ हजार २८४
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ५ लाख १२ हजार १०९
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २ लाख २ हजार १३१
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – ७६ कोटी ४१ हजार ६७७
देशातील एकूण लसीकरण – १ अब्ज ७५ कोटी ४६ लाख २५ हजार ७१०