नवी दिली / वृत्तसंस्था
भारतात गेल्या 24 तासांत 38 हजार 667 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 478 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 35 हजार 743 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चार दिवसांनंतर पुन्हा एकदा नव्या बाधितांचा आकडा 40 हजारांच्या खाली आल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्याच्या घडीला 3 लाख 87 हजार 673 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 3 कोटी 21 लाख 56 हजार 493 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या एकंदर बाधितांपैकी 3 कोटी 13 लाख 38 हजार 88 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.45 टक्के इतका आहे. देशात सध्या आठवडय़ाला पॉझिटिव्हिटी रेट 2.05 टक्क्मयांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 53 कोटी 61 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे.









