ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जागतिक महामारीच्या विरूद्ध लढ्यात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. चाचण्यांची एकूण संख्या 15 कोटीच्या पुढे गेली आहे.

गेल्या 24 तासांत,9,22,959 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यामुळे भारताची चाचण्यांची एकूण संख्या वाढून 15,07,59,726 झाली आहे.
शेवटच्या एक कोटी चाचण्या केवळ 10 दिवसात करण्यात आल्या. सातत्याने सर्वसमावेशक आणि व्यापक चाचण्या केल्यामुळे सकारात्मकता दर खाली आला आहे.
अन्य एका महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये, सलग अकरा दिवस भारतामध्ये दररोज 40,000 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात देशात केवळ 31,521 व्यक्ती कोविड बाधित असल्याचे आढळले.









