ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 543 रुग्णांची भर पडली आहे. तर 62 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 435 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 934 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 380 रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत 6 हजार 868 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 23 टक्के असून देशातील सतरा जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांपासून एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही आहे. काही ठिकाणी लॉक डाऊन चे पालन केले जात नाही आहे. त्या ठिकाणी अधिक कठोर कारवाई केली जाईल असे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत.
पुणे शहरात कोरोना रुग्णांचा वेग सर्वाधिक आहे.केंद्राची पथके विविध राज्यात पाहणीसाठी गेली असून या पथकांनी अहमदाबाद, सुरत चा दौरा केला आहे. पोलिसांकडून बंदोबस्ताबरोबरच ड्रोन द्वारे ही नजर ठेवली जात आहे, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.









