ऑनलाइन टीम नवी / दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 336 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 18 हजार 601 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 590 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 47 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 3 हजार 252 रुग्ण बरे झाले असते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, काल एका दिवसात देशात सर्वाधिक म्हणजेच 705 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच देशातील 61 जिल्ह्यात गेल्या चौदा दिवसात एकही रुग्ण आढळला नाही.
– कोरोना विरोधात लढाईसाठी सरकार कडून वेबसाईट
कोरोनाच्या लढ्यासाठी सरकारकडून ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या वेबसाईट वर डॉक्टर्स आणि रुग्णालयाची सर्व माहिती उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या यावर यामध्ये 201 सरकारी रुग्णालयाची ऑनलाइन माहिती उपलब्ध आहे. कोरोनाच्या ट्रेनिंग साठी बनवण्यात आलेल्या वेबसाईट चे नाव Igot.gov.in असे या असून आत्ता पर्यंत एक लाख 31 हजार लोकांनी रजिस्टर केले आहे.
गृह मंत्रालयाकडून सोमवारी लॉक डाऊन चा आढावा घेतला गेला. 21 तारीख पासून काही भागात अत्यावश्यक सेवा, दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आले आणि ते सुरळीत रित्या सुरु आहेत. तसेच मजदुरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे परमिट देण्यात आले आहे. असही गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
आता पर्यंत चार लाख 49 हजार 810 टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर काल दिवसभरात 35 हजार पेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या. तसेच रॅपिड टेस्ट चे किट राज्यभरात वाटप करण्यात आले आहे. रॅपिड टेस्ट बाबत एका राज्यातून तक्रार आली आहे. या रिपोर्ट मध्ये अधिक अंतर आहे त्यामुळे पुढील दोन दिवस याचा उपयोग करू नका असे आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना रुग्णांसाठी ची रुग्णालये, सुविधा, चाचण्या अशा सर्व आघाड्यांवर क्षमता वाढवण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.









