ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात 1 कोटी 03 लाख 74 हजार 932 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 50 हजार 114 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
मागील 24 तासात 18 हजार 088 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 264 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 2 लाख 27 हजार 546 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 99 लाख 97 हजार 272 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 17 कोटी 74 लाख 63 हजार 405 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 लाख 31 हजार 408 तपासण्या मंगळवारी (दि.05) करण्यात आल्या.









