‘डेल्टा’चा आणखी एक प्रकार समोर
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सिंगबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 230 प्रकारांची पुष्टी झाल्याचे शास्त्रज्ञांनी उघड केले आहे. त्यामधील काही प्रकार मानवासाठी हानिकारक आहेत. त्यामधील एक म्हणजे डेल्टा, हा प्रकार आता देशभरात पसरला आहे. डेल्टाचे दोन प्रकार देशात उघडकीस आले होते, पण आता त्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे, ज्याचे नाव ‘AY-3’ आहे.
अमेरिकेनंतर भारत असा दुसरा देश आहे की, ज्या देशात डेल्टाचे तीन प्रकार आढळले आहेत. त्यामुळे जीनोम सीक्वेन्सवर लक्ष ठेवणाऱ्या इन्साकॉगने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. AY-3 प्रकारांची प्रकरणे अजूनही खूप कमी आहेत, परंतु त्यावर अभ्यास चालू आहे. शास्त्रज्ञांचा एक गट त्यावर लक्ष ठेवून आहे.









