बेंगळूर/प्रतिनिधी
देशात मुंबई आणि दिल्ली हे कोरोना रुग्णवाढीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत, तर आता बेंगळूर हा जिल्हा सर्वात जास्त सक्रिय प्रकरणांचा जिल्हा म्हणून समोर आला आहे.
बेंगळूरमध्ये शुक्रवारी १६,६६२ कोरोना प्रकरणांची भर पडली असून शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १,४९,६२४ वर पोचली आहे. शुक्रवारी पुणे १.१ लाख सक्रिय प्रकरणांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे १ लाख आहे, तर मुंबईत ही संख्या ८१,१७४ इतकी आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या चार राज्यात कर्नाटक राज्यातील बेंगळूर जिल्ह्यात सक्रिय प्रकरणे सर्व राज्यांपेक्षा जास्त आहेत. दरम्यान बेंगळूरमध्ये जवळपास ७० टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.
बेंगळूरमध्ये वाढत्या कोरोना संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अशीच वाढ सुरु राहिल्यास शहराच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर परिणाम होऊ शकतो. रुग्णसंख्या वाढतच राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरीकाकांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.