ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 722 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशभरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी आकडेवारी असून, देशात 5351 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 160 जणांचा मृत्यू झाला आहे. 468 जण या आजारातून सुखरूप बरे झाले आहेत. त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील 24 तासात देशात 722 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रातही मागील 24 तासात 150 हून अधिक कोरोना रुग्णाची वाढ झाली असून, कोरोनाग्रस्तांची संख्या 1018 वर पोहचली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ज्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्या शहरांमधील काही भाग सील करण्यात आला आहे.









